रांजणगाव गणपती : जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तत्कालीन दहावीत असणाऱ्या बॅचचे विद्यार्थी गेट टूगेदर घेत आहेत. ‘नाते मैत्रीचे आणि हृदय संवादा’चे या शीर्षकाखाली मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला हायस्कूल, रांजणगाव गणपती येथील २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेहसंमेलन मेळावा प्रशालेतील प्रांगणात पार पडला आहे. या मेळाव्यात एकूण ७० माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजेरी लावली होती.
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेतील इयत्ता दहावी २००४-०५ वर्षातील तत्कालीन विद्यार्थ्यांनी हृदय संवाद या शीर्षकाखाली मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात १५ शिक्षकांनी हजेरी लावली होती. यात प्रामुख्याने तुकाराम फंड, निळकंठ जोशी, वसंत औटी, पद्माकर खणगे, अशोक शेळके, रामदास शिंदे, गणेश वेताळ, मच्छिंद्र बनकर, ब्रिजेशकुमार मकर, सुनंदा भोगावडे, नंदकुमार अनारसे, दत्तात्रय भुजबळ, वंदना रासकर आदी शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाची धुरा सामाजिक शास्त्र या विषयाचे तज्ञ अध्यापक दत्तात्रय भुजबळ यांच्या खांद्यावर विद्यार्थ्यांनी एकमताने देण्यात आली होती. तसेच स्नेहल भुजबळ यांनी अध्यक्ष पदासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने अनुमोदन देखील दिले.
स्नेहमेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थी अतुल जगदाळे यांनी प्रास्ताविक केले असून पूर्णतः सूत्रसंचालन भारती पाचुंदकर व विलास बत्ते या जोडगोळी विद्यार्थ्यांनी केली. २००४-०५ ची बॅच मधील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येऊन तब्बल २० वर्षांनी एकत्र येण्याचे ठरले. माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा हृदय संवाद मेळावा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र विशेष सागर लांडे, गौतम पवार, महावीर कटारिया या तिघांनी सर्व विद्यार्थ्यांना संपर्क करून एकत्र करण्याचे काम केले आणि दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी स्नेहमेळावा घेण्याचे ठरवले.
हृदय संवाद मेळावा उत्साहात साजरा करत असताना विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केली. अजित लांडे, तुषार पाचुंदकर, गोरक्ष बत्ते , रामदास खेडकर, दिपाली गायखे, प्रिया दाते, प्रियांका सोनवणे, चैताली भुजबळ, वृषाली गदादे यांनी आपल्या मनोगतातून सर्व उपस्थितांची मने जिंकली. दुःखित अंतःकरणाने आपल्यात नसणाऱ्या शिक्षकांना काही क्षण मौन पाळत विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांना कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह देण्यात आले व माजी विद्यार्थ्यांना स्पेशल रिटर्न गिफ्ट देण्यात आले. सध्या स्थितीतील प्रशालेचे मुख्याध्यापक सुनिल थोरात यांनी माजी विद्यार्थ्यांना प्रशालेसाठी दिलेल्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सरते शेवटी अभिजीत खेडकर यांनी आभार मानले व पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Add Comment