शिरूर : कारेगाव ग्रामपंचायतचे राजकारण सातत्याने चर्चेत राहिले आहे. मोठा कर मिळणारी ही ग्रामपंचायत म्हणून प्रचलित आहे. या ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान विकास कामे पूर्ण झालेली असतानाही त्यावर निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कामांच्या निविदेतील काही विकासकामे लोकसहभागातून झालेली असतानाही निविदा काढली कशी ? सदर केलेल्या कामांची निविदा प्रसिद्ध करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा ग्रामपंचायतमधील प्रमुखांचा हेतू असल्याचा प्रश्न ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच तुषार नवले यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात नवले यांनी पुणे जिल्हा परिषद मुख्य अधिकारी संतोष पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या विषयाबाबत नवले यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने कारेगाव ग्रामपंचायतीची एप्रिल २०२२ ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत सखोल दप्तर तपासणी करून चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान ऑक्टोंबर २०२४ आणि नोव्हेंबर २०२४ या मासिक सभा प्रोसेडींग मध्ये छेडछाड करल्याचा आरोप उपसरपंच नवले यांनी केला आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिकारी हे सदर प्रोसेडिंग मध्ये फेरफार करण्यात शक्यता नाकारता येत नाही असा सवाल देखील उपसरपंच नवले यांनी उपस्थित केला जात आहे.
मासिक सभेत झालेल्या चर्चेनंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांची स्वाक्षरी करून त्या महिन्याचे प्रोसेडिंग बंद करण्यात येत असते. त्यानंतर पुढील महिन्याचे कामकाज सुरू होत असते. कारेगाव येथे यापूर्वी देखील घोटाळा झाल्याचे आरोप झालेले आहेत. मात्र या प्रकरणामध्ये येणाऱ्या काळात चौकशी दरम्यान मोठा घोटाळा उघडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कारेगाव ग्रामपंचायतचा हा भोंगळ कारभार आहे की काय असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
Add Comment