रांजणगाव : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्रातुन दरोडा टाकून चोरी केलेल्या चार आरोपींना पोलिसांनी चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. तसेच एका आरोपींचा शोध सुरू असून रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील ज्ञानेश्वर कान्हु डांगे ( रा. सोनेसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे ) यांचे मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्र येथे दि. ०३.०१.२०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास कारेगाव येथील सराईत गुन्हेगार प्रथमेश उर्फ बच्चा नवले याने त्याचे साथीदार आरोपी आर्यन नवले, ओम पवार, वैभव गाडे यांनी हातामध्ये लोखंडी कोयते घेवुन दहशत माजवत ज्ञानेश्वर कान्हु डांगे व त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश हिरामण डांगे यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्यांचेकडुन रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली आहे. याप्रकरणी फिर्यादीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरोडा झालेल्या गुन्हाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तीन ठिकाणी हे तपास पथक तयार करून पाठवले. आरोपींचा तपास पथकाच्या मदतीने चोवीस तासांच्या आत गुन्हयातील आरोपी ओम दिलीप पवार ( सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. नाथनगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर ), वैभव धोंडीभाऊ गाडे ( मुळ रा. चांडवली, ता.खेड.जि.पुणे ) यांना सदर गुन्हयाचे अटक करण्यात आलेली असुन त्याच्या सोबतचे इतर दोन अल्पवयीन बालकांना देखील गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा नवले याचा शोध सुरु आहे.
सदरची कामगीरी पंकज देशमुख ( पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ), रमेश चोपडे ( अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ) , प्रशांत ढोले ( उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शिरुर विभाग ) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर, पो.हवा. संतोष औटी, चा.पो.हवा. माऊली शिंदे, पो.काँ. आकाश सवाणे, पो.कॉ. किरण आव्हाड यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करीत आहेत.
Add Comment