शिरुर तालुक्यात इच्छुकांची उमेदवारी जाहीर.
शिरुर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात, केवळ सुप्रीम कोर्टाकडून येणाऱ्या निर्णयाच्या प्रत्येक्षेत इच्छुक उमेदवार आहेत. निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल परंतु इच्छुक उमेदवारांनी आताच तयारीचे रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे.
शिक्रापुरचे माजी सरपंच आणि शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामभाऊ सासवडे यांनी शिरुर तालुक्यात असणारा संपूर्ण मित्र परिवार चिंचोली मोराची येथील त्यांच्या शेतावर स्नेहभोजन आणि बैठकीसाठी बोलावून घेतला होता. या मेळाव्याला एक हजारपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल, सविता बगाटे, माजी सभापती सुभाष उमाप, माजी पंचायत समिती सदस्य भगवान शेळके यांसह अनेक गावचे सरपंच, माजी सरपंच, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, पहिलवान यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान सासवडे यांनी बोलताना सांगितले की, या व्यासपीठावर असलेल्या आम्हा सर्वांना राजकारणात घेऊन आलेल्या मंगलदास बांदल यांचा निरोप घेऊन मी आलो आलो आहे. नुकतीच झालेली विधानसभा निवडणुक आपण सर्वांनी मंगलदास बांदल यांच्या आदेशानुसार ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखाली जिंकली आहे. आता बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी तयारीला लागा म्हणून पहिलवान बांदल यांचा निरोप आहे. तुमच्या सर्वांच्या मदतीने येणारी जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक मी लढणार आहे, अशी घोषणा यावेळी रामभाऊ सासवडे यांनी केली.
Add Comment