शिरूर : भारत हा पुरुष प्रधान देश आहे. त्यात वाहन चालवण्यासाठी पुरुषांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र वाहन चालवण्यासाठी महिला देखील आता मागे नाही. महाराष्ट्रात पोलीस खात्यात असलेल्या सरकारी वाहनांवर महिलांची वाहन चालक म्हणून मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. अशातच महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात असलेल्या एका महिला वाहन चालकाचे विशेष कौतुक केले आहे.
पुणे नगर महामार्गावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व्हीआयपी,मंत्री, न्यायाधीश किंवा सरकारी महत्त्वाचे वाहने जात असताना स्थानिक पोलीस ठाण्याची सरकारी वाहन स्वतःच्या हद्दीतून पायलेटिंग करत दुसऱ्या हद्दीपर्यंत जात असतात. अशातच पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे या जात असताना नेहमीप्रमाणे चालक चालक शुभांगी लबडे या सरकारी वाहन घेऊन पायलेटिंग करण्यासाठी गेल्या होत्या. शुभांभी यांनी वेळेच्या आत मंत्री महोदयांना योग्य रस्त्याने वेळत घेऊन गेल्या. मात्र मंत्री आदिती तटकरे यांना आपल्या पायलेटिंग करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात महिला वाहन चालक असल्याचे समजताच त्यांनी संपूर्ण ताफा थांबवण्यास सांगितले.
रांजणगाव येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस वाहन चालक शुभांगी लबडे यांना वाहनाच्या खाली बोलावून मंत्री आदिती तटकरे यांनी वाहन चालविण्याच्या कलेचे कौतुक केले. या घटनेमुळे पोलीस वाहन चालक शुभांगी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच पुरुष प्रधान असलेल्या देशात एक महिला दुसऱ्या महिलेला सुरक्षितरित्या वेळेच्या आत योग्य मार्गाने घेऊन जातात यासाठी शुभांगी या अनेकांना प्रेरणा देत आहे. यामुळे पोलीस वाहन चालक शुभांगी लबडे यांना ‘The बातमी’चा सलाम !
Add Comment