क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

दुर्दवी प्रकार, रांजणगावमध्ये वेठबिगारी आणि अमानुष मारहाण..!

४० ते ५० कामगारांना अमानुष मारहाण आणि ठेवले डांबून.

रांजणगाव : पुणे जिल्ह्याच्या पंचतारांकित असलेल्या रांजणगाव एमआयडीसीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र व परप्रांतीय असलेले तब्बल ४० ते ५० कामगारांना डांबून ठेवत मारहाण करून वेठबिगारी करण्यास भाग पडल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव एमआयडीसीत रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी येत आहेत. पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत कामास आलेल्या तरुणांना थेट कंपनीत काम दिले जात नाही, मात्र त्यांना कंत्राटी पद्धतीने रोजगार दिला जातो. परंतु रांजणगाव एमआयडीसी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढोक सांगवी हद्दीतील एस. के. एच. कंपनी समोर असलेल्या नवनाथ अभंग यांच्या रुममध्ये तब्बल महाराष्ट्र व परप्रांतीय ४० ते ५० कामगारांना धमकावून वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले आहे.

त्याचबरोबर अभंग यांच्या रुममध्ये डांबून ठेऊन केलेल्या कामाचे पैसे न देता कंत्राटदार सुनील वाघळकर व सुपरवायझर अक्षय काळे याला या कामगारांनी दवाखान्यात जाण्यासाठी पैसे मागितले असता फायबर पाईपने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली असल्याने कंत्राटदार आनंद दिगंबर वाघळकर व सुनील दिगंबर वाघळकर, प्रशांत श्रावण साळवे व सुपरवायझर अक्षय काळे यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेठबिगार कायद्या अंतर्गत सुधाकर रामराव माखणे ( सध्या रा. ढोकसांगवी, तालुका शिरूर जिल्हा पुणे. मूळ रा. वसमत आसेगाव रोड ता. वसमत जि. हिंगोली ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी आनंद दिगंबर वाघळकर, प्रशांत श्रावण साळवे यांना पोलिसांनी अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहे.

रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील रहिवासी नवनाथ अभंग यांच्या मालकी असलेल्या रुममध्ये तब्बल ४० ते ५० कामगारांबाबत धक्कादायक प्रकार घडत असताना अभंग यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. तसेच या गुन्ह्यात ज्याप्रमाणे आरोपी दोषी, त्याचप्रमाणे रूम मालक देखील तितकाच दोषी असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच फरार आरोपी यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी कामगारांकडून होत आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!