क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

शिरुर पोलिसांचे आरोपींना अभय?, आरोपी मोकाट !

शिरुर | रांजणगाव एमआयडीसी परिसरातील करडे गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीची बनावट कागदपत्रे तयार करून माजी सैनिकाच्या पत्नीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पोलिस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहेत.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी फेज-३ चे काम प्रगती पथावर सुरू आहे. करडे गावात माजी सैनिकाची पत्नी रेश्मा राहुल वाळके यांनी दोन भागीदारांसह डब्लू स्क्वेअर फीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती. यामध्ये भागीदार असलेल्या करडे येथील संभाजी दगडू वाळके, सचिन संभाजी वाळके यांनी डायरेक्टर पदावर प्रियांका संभाजी वाळके यांना नियुक्त केले नंतर पुढे कोणतीही पूर्व कल्पना न देता रेश्मा वाळके यांचे संचालक पदावरून नाव कमी करण्यासाठी कंपनीची बनावट कागदपत्रे तयार करून बनावट त्यावर बनावट सह्या करून अनोळखी सी ए च्या मदतीने रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी ( RCO ) च्या संकेतस्थळावर अपलोड केली. यामुळे रेश्मा यांना भागीदारीत असलेल्या कंपनीच्या संचालक पदावरून हटवण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच रेश्मा आणि राहुल वाळके यांनी पोलिसात धाव घेतली, मात्र शिरूर पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. शिरुर पोलीस दाद देत नसल्याने रेश्मा आणि राहुल यांनी थेट पोलिस अधीक्षक पुणे यांची भेट घेतली व संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शिरूर पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर हा गुन्हा नोंद करून घेतला आहे. याप्रकरणी संभाजी दगडू वाळके, सचिन संभाजी वाळके, प्रियांका संभाजी वाळके व अनोळखी व्यक्ती असे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेली टाळाटाळ आणि आरोपींना अटक होत नसल्याने शिरुर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी मात्र अद्याप मोकाट फिरत आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांचे नेमकं चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिवसेंदिवस आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत चालले आहेत. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. तसेच अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने कडक कारवाई करून लवकरात लवकर ताब्यात घेणे गरजेचे आहे. अन्यथा तेल लाऊन तर फक्त पैलवान निसटत असतात. तर आर्थिक फसवणूक करून गुन्हेगार निसटले जाऊ नये हीच अपेक्षा.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!