शिरूर : नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या गणेगाव खालसा येथे घडले आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या गणेगाव दुमाला ( ता. शिरूर, जि. पुणे ) येथील मिनाबाई न्यानेश्वर गांगुर्डे ( वय 27 वर्ष सध्या रा.-गणेगाव ता. शिरूर जि. पुणे मुळगाव : दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव ) यांनी नाशिक येथील नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी पती ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे ( रा. गणेगाव खालसा, ता.शिरूर, जि. पुणे, मुळगाव दडपिंपरी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ) याने सुभाष बाबू काळे यांच्या जागेत पत्नी मीनाबाई हिला रस्सीने गळा आवळून खून केला आहे. याप्रकरणी मयत असलेली मीनाबाई हिचा नातेवाईक ताराचंद सुखलाल मोरे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी खून करून फरार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक रांजणगाव, एमआयडीसी महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करत आहे.
Add Comment