क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

अन्न व औषध प्रशासन अधिकारी सांगून पैशांची मागणी ! आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

शिरूर : रांजणगाव गणपती येथे अन्न व औषध प्रशासन अधिकारी सांगून दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या तोतया अधिकाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव गणपती ( ता.शिरूर) येथील न्यू चामुंडा स्वीट होम व जय भवानी स्वीट होम या दोन मिठाई दुकानांमधून आरोपी उगमा राम खानो राम ( रा. स्पाईन रोड सिताराम दगडू चिंचवडे चौक चिंचवड पुणे सिटी चिंचवडगाव पुणे ) याने अर्धा किलो काजू कतली, दोन समोसे पार्सल घेतले. त्यानंतर या पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे सांगून मी अन्न व औषध प्रशासन अधिकारी आहे असे सांगितले. आरोपी उगमा हा तोतया गिरी करून कारवाईची धमकी दिली, तसेच प्रकरण मिटवून घेण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ ठाकूर देवासी व अमित कुमार देवासी ( सध्या रा. रांजणगाव बस स्टॉपजवळ आर्या कॉम्प्लेक्स, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. जिवंत कला ता. राणी जि. पाली, राजस्थान ) असे प्रत्येकाकडून दहा हजार रुपयांची मागणी केली. हा अधिकारी तोतया असल्याचे भासल्याने याबाबत फिर्यादी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तात्काळ धाव घेत तक्रार दिली. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी उगमा यास अटक करण्यात आली असून रविवार दि. २२.०२.२०२५ पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे पंकज देशमुख, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गुलाब येळे तपास करीत आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!