Uncategorized क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

पुन्हा दाखल गुन्हा | व्यावसायिक, दुबार कुलमुखत्यारपत्र आणि फसवणूक !

शिरुर : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे जमीन व्यवहारात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन जमीन बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र तयार करून दोन वेळा विकल्याचा आरोप दिपक पंचमुख आणि त्यांची पत्नी रविता पंचमुख यांच्यावर असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दोघांसह एकूण १४ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक संदीप सुदाम कुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २०१८ आणि २०२२ मध्ये जिल्हाधिकारी यांची परवानगी घेत नियमानुसार काही जमिनींची खरेदी केली होती. मात्र, पंचमुख दाम्पत्याने मुळ मालकांच्या मदतीने त्याच जमिनीचे तिसऱ्यांदा कुलमुखत्यारपत्र तयार करून त्या जमीनीतील एका गटाची दुसऱ्या व्यक्तीस विकल्याची बाब उघड झाली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच दिपक राजकुमार पंचमुख व रविता दिपक पंचमुख या दोन पती-पत्नीसह भिमराव सारंग रोकडे, सुभाष सारंग रोकडे, सविता वसंत राजगुरु, सुनिता भिमराव रोकडे, सागर भिमराव रोकडे, स्वाती सचिन गायकवाड, निशा भिमराव रोकडे लग्नानंतरचे नाव निशा अभिषेक सपकाळ, मंगल सुभाष रोकडे, स्वप्निल सुभाष रोकडे, प्रशांत सुभाष रोकडे, राकेश सुभाष रोकडे, मयुर वसंत राजगुरु यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत.

पुन्हा दाखल गुन्हा…!

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका व्यावसायिकाने  अशाच प्रकारचा गुन्हा दीपक पंचमुखसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण अगदी ताजे असताना पुन्हा दीपक पंचमुख आणि पत्नी रविता पंचमुख यांच्यासह एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकामागे एक दोन गुन्हे दाखल झाल्याने आणखी प्रकार समोर येण्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!