शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपी पोलिसांना चकवा देऊन घटनास्थळावरून पळ काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कारेगाव ( ता.शिरूर ) येथील यश इन चौक परिसरातील सोपानराव वडेवालेच्या समोरील बाजूस विना नंबर प्लेटची टाटा पंच कंपनीच्या चारचाकीमध्ये एक अज्ञात इसम गुटखा विक्री करण्यासाठी उभा होता. पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेण्याअगोदर फरार झाला आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला, स्वादिष्ट तंबाखू सुपारी यावरील उत्पादन,साठा,वितरण वाहतूक विक्री यावर बंदी घातलेली असताना देखील विक्री होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत गुटखा आणि टाटा कंपनीची चारचाकी असा एकूण ९ लाख ०९ हजार एवढा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बाबासाहेब झेंडे ( नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिरूर विभाग शिरूर ) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश आगलावे करीत आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला, स्वादिष्ट तंबाखू सुपारी यावरील उत्पादन,साठा,वितरण, वाहतूक विक्री यावर बंदी घातलेली असताना सर्रासपणे गुटखा महाराष्ट्रात येतो कसा असा सवाल उपस्थित होत आहे. गुटखा उत्पादकांनी विक्रीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या राज्यात बंदी आहे त्या राज्यात त्यांचे गुटखा पोहोचला जाऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरून गुटखा वाहतूक बंदी घालावी आणि महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होण्यास रोखावे.
Add Comment