रांजणगाव गणपती | निमगाव भोगी येथील महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीमुळे शेतजमीन, पाणी तसेच हवा प्रदूषित झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. यासंदर्भात गावांची पाहणी करण्यासाठी माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट देणार होते मात्र पवार यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या निमगाव भोगी परिसरातील हवा, जमीन व पाणी प्रदूषणाने नापीक झाली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे निमगाव भोगी, कर्डिलेवाडी, सरदवाडी, अण्णापुर, कारेगाव, रामलिंग आणि शिरूर शहरातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याने वेळोवेळी ग्रामस्थांनी आंदोलने व उपोषण केलेले आहेत. मात्र या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याच्या तक्रारी शरद पवार यांच्याकडे स्थानिकांनी केल्या होत्या. खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन MEPL हटावचा नारा देण्यात आला. शरद पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रदूषणाविषयी पाठपुरावा ग्रामस्थ व स्थानिक नेत्यांनी केला होता. याच घटनेची दाहकता लक्षात घेता शरद पवार आज ( बुध.दि.२३ ) रोजी प्रदूषणग्रस्त गावांना भेट देणार होते . तसेच परिस्थिचा आढावा घेणार होते. परंतु अचानक पवार यांचा दौरा रद्द झाल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे दौरा करून परिस्थितीचा आढावा घेऊन शरद पवार यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत.
Add Comment