Uncategorized आंबेगाव इंदापूर खेड जुन्नर ताज्या घडामोडी दौंड पुणे पुणे शहर पुरंदर बारामती भोर मावळ मुळशी वेल्हा शिरूर हवेली

सावधान ! भाडेकरूंची माहिती न दिल्यास होईल कायदेशीर कारवाई…!

शिरूर : घरमालकांनी घर किंवा रूम भाडेतत्वावर देताना भाडेकरूंबाबत माहिती ठेवणं आवश्यक आहे.भाडेकरार करून भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात देऊन गुन्हेगारी व दहशतवादी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे. गुन्ह्याची तत्काळ उकल होण्यासाठी भाडेकरूंची माहिती पोलिसांना आवश्यक ठरणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पंचतारांकित असलेल्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात भारताच्या कानाकोपऱ्यातून कामगार येत आहेत. तसेच जगातील काही देशांमधून देखील परिसरात कामगार येत असतात. औद्योगिक वसाहतीत असलेल्या कामगारांना राहण्यासाठी घर अथवा रूम भाडे तत्वावर देत असताना घरमालकांनी त्यांच्याशी भाडेकरार करणे आवश्यक आहे. मात्र या परिसरात तसे होताना दिसत नाही. परंतु भाडेकरूंची संपूर्ण माहिती घेऊन ती स्थानिक पोलिस ठाण्यात कळवणे आवश्यक आहे. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे. जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत राहणारे मालमत्ताधारक यांनी त्यांच्याकडील घरे, दुकान गाळे, फ्लॅट, फार्म हाऊस इ. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे, पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्यांची, भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास कळवणे बंधनकारक आहे. मात्र शिरूर, रांजणगाव आणि शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरळक प्रमाणात माहिती पोलिस ठाण्यात देण्यात येत आहे. तसेच भाडेकरार न करता भाडेतत्वावर मालमत्ता दिली जात आहे. भविष्यात मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

कुठल्याही घरमालकांनी घरे, दुकान गाळे, फ्लॅट, फार्म हाऊस भाडेतत्वावर देताना भाडेकरूंची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच भाडेकरार करणे आवश्यक असून ही सर्व माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. असे न केल्यास घरमालकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

प्रशांत ढोले ( पोलिस उपअधीक्षक, शिरूर )

error: Copying content is not allowed!!!