कारेगाव : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या कारेगाव येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायतचे सांडपाणी चक्क महामार्गावर सोडण्यात येत आहे. यामुळे कारेगाव येथील ग्रामस्थांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सांडपाण्यामुळे महामार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारेगाव येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या व्यवसायांमार्फत मोठ्या प्रमाणावर कर जमा होतो. गावात अनेक ठिकाणी सांडपाणीची विल्हेवाट लावण्यासाठी गावात अंतर्गत गटार लाईनचे काम झालेले आहे. तसेच या गटार लाईनसाठी भरमसाठ खर्च करून कामे केलेली आहेत. परंतु या गटार लाईनचे आउटलेट कारेगाव ग्रामपंचायतचे थेट पुणे-नगर महामार्गावर सोडले आहे. यासंदर्भात नागरिक आणि नगरहून पुण्याकडे जाणारे प्रवासी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
आम्ही पुणे-नगर महामार्ग खोदुन सांडपाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेऊन नैसर्गिक ओढ्यात सोडणार आहोत. परंतु संबंधित खात्याने आम्हाला पाईनलाईन क्रॉसिंगची अजुन परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कारेगावचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परंतु जोपर्यंत आम्हाला पाईनलाईन क्रॉसिंगची परवानगी मिळत नाही. यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करणार आहोत.
–किसन बिबे ( ग्रामविकास अधिकारी, कारेगाव ग्रामपंचायत )
Add Comment