शिरूर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली. अटकेतील आरोपी कमरोल रमजान शेख (३२), अकलस मजेद शेख (३९), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (३५) आणि जाहिद अबूबकर शेख (३०) हे कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून मागील दोन वर्षांपासून कारेगाव येथे राहत होते. त्यांच्याकडे बनावट भारतीय आधारकार्ड आढळले आहे.
११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री ११:२० दरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर १२ जुलै रोजी पहाटे ३:४५ वाजता पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे मोसिन बशीर शेख यांनी फिर्याद दिल्यानंतर रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे, विशाल भोरडे, रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने व पोलीस पथकाने हि कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत.
Add Comment