शिरूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील नव्याने जाहिर झालेल्या आराखड्याच्या विरोधात तळेगाव ढमढेरे गावातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गावाच्या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या विभागणी विरोधात ग्रामस्थांनी “कडकडीत गाव बंद आंदोलन व जाहीर निषेध मोर्चा” आयोजित केला आहे.
ग्रामस्थांनी एकवटून गावाचा अभिमान जपत शासनाच्या या निर्णयाविरोधात आवाज बुलंद करण्याचे ठरवले असून, गाव बंद आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.या आंदोलनामार्फत शासनाच्या नजरेस हा निर्णय चुकीचा असून त्यात फेरविचार करावा, ही जोरदार मागणी केली जाणार आहे.
मोर्चाची सुरुवात श्री हनुमान मंदिर (बाजार मैदान) येथून होणार असून तो ग्रामपंचायत कार्यालय येथे पोहोचेल. त्यानंतर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.हे आंदोलन शांततामय पद्धतीने पार पाडले जाणार असून गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
Add Comment