आंबेगाव ताज्या घडामोडी पुणे शिरूर

पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का, मनसे सोडून भाजपात प्रवेश !

शिरूर : पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा चढाओढ निर्माण झाली आहे. शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते नानासाहेब लांडे यांनी अचानक मनसे पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

नानासाहेब लांडे हे शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दीर्घकाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते राहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मनसेने या भागात बळकट स्थिती निर्माण केली होती. मात्र, काही महिन्यांपासून पक्षाच्या धोरणांवर असमाधान व्यक्त करत नानासाहेब लांडे यांनी भाजपमध्ये आपली नवी वाटचाल सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने त्यांच्या अनुभव व नेतृत्व कौशल्याचा गौरव करत शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व जबाबदारी नानासाहेब लांडे यांना सोपवले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत उत्स्फूर्त स्वागत केले असून नानासाहेब लांडे यांच्या सहभागामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या बदलामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरूर आंबेगाव मतदारसंघातील सत्तास्थितीला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, नानासाहेब लांडे यांचा भाजपात प्रवेश स्थानिक मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणार आहे. भाजपच्या राजकीय धोरणांमध्ये स्थानिक विकासाला प्राधान्य दिले जाणार असून त्यांच्या अनुभवाचा भरपूर उपयोग करण्यात येणार आहे.

यावेळी नानासाहेब लांडे म्हणाले,”माझा हा निर्णय पूर्णपणे जनतेच्या हितासाठी असून, विकास व प्रगतीसाठी योग्य दिशा दाखविणारा आहे. भारतीय जनता पक्षाच्या बळावर आम्ही शिरूर आंबेगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साध्य करू. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू”

पुढील काळात या बदलामुळे शिरूर आंबेगाव विधानसभा क्षेत्रात राजकीय रंगभूमी कशी सजते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने मोठी तयारी सुरु केली विरोधकांना चांगलाच संघर्ष करावा लागेल असा अंदाज व्यक्त केली जात आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!