शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANTF, कोल्हापूर रेंज, पुणे) केलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ रोजी दुपारी ३.३० वा. अमली पदार्थ टास्क फोर्सच्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती गांजाची वाहतूक करणार आहेत. या अनुषंगाने त्यांनी तात्काळ सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी आरोपी संशयास्पद हालचाल करताना आढळले. पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला.तब्बल २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत अब्दुल वासीम अब्दुल सय्यद (वय ३५, रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी, जि. अहमदनगर), मुबशीर उर्फ जिमी सय्यद खान (वय २७, रा. रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी, जि. अहमदनगर ) आणि राहुल रामदास कनगरे ( वय २६, रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी, जि. अहमदनगर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे.आरोपी एकत्रितपणे गांजाची विक्री करण्यासाठी वाहतूक करत होते. त्यांच्याकडून गांजा, वाहन आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक समाधान मचाले,पोलिस अंमलदार सहा. फौज. अनिल पास्ते, हेड कॉन्स्टे. बंद्रे, प्रशांत बोमदंडी, चेतन चव्हाण, किशोर बर्गे, यांनी रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके आणि सहा.फौज. दत्तात्रय शिंदे वाहन चालक पांडुरंग साबळे यांच्या सहभाग आणि ने ही ही मोहीम राबवली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा गांजाचा साठा पकडण्यात यश आले.
Add Comment