पुणे : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असून, गटनिहाय आरक्षित आणि सर्वसाधारण जागांचे वर्गीकरण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच सर्वसाधारण प्रवर्ग अशा चार मुख्य प्रवर्गांमध्ये या जागांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गटांसाठी हे आरक्षण संगणक यादृच्छिक पद्धतीने ठरविण्यात आले असून, प्रशासनाने पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे.
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षित गट : लासुर्णे, वालचंदनगर, गुणवडी, लोणी काळभोर
अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षित गट: नीरावागज, गोपाळवाडी, उरुळीकांचन
या गटांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात आले असून, महिलांसाठी राखीव गटांमुळे ग्रामीण महिलांना राजकीय क्षेत्रात पुढे येण्याची मोठी संधी मिळणार आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला आरक्षित गट: बारव, शिनोली, डिंगोरे
अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षित गट: वाडा, टाकवे बुद्रुक
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित गट: नारायणगाव, नीरा शिवतक्रार, थेऊर, पळसदेव, कडूस, राजुरी, सुपा, ओतूर, बोरी बुद्रुक, न्हावरा
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षित गट:पेरणे, पौड, वेल्हे बु, मेदनकरवाडी, पिरंगुट, मांडवगण फराटा, यवत, अवसरी बुद्रुक, वेळू
सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षित गट: रेटवडी, पाटस, वडगाव निंबाळकर, तळेगाव ढमढेरे, निमगाव केतकी, खडकाळे, कळंब, वरवंड, शिक्रापूर, घोडेगाव, इंदोरी, खेड शिवापूर, पाईट, भिगवण, रांजणगाव गणपती, कुरुळी, सोमाटणे, भावडा, गराडे, कोरेगाव मूळ
सर्वसाधारण : आळे, सावरगाव, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, कवठे येमाई, पाबळ, नाणेकरवाडी, कुसगाव बुद्रुक, हिंजवडी, खडकी, बोरी पारधी, बेलसर, वीर, विंझर, भोंगावली, भोलावडे, उत्रोली, पाणदरे, निंबूत, वडापुरी, काटी, बावडा
या गटांवर सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. काही गटांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
Add Comment