राजकीय शिरूर

केंदूर- पाबळ गटात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असंतोष.. ?

उमेदवारी बदलण्याच्या हालचाली, भाजपची सरशी.


पाबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारी बाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला असल्याने अनेक गावांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केल्यामुळे असंतोष निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद सदस्य पदासाठी प्रफुल्ल शिवले, केंदूर – करंदी पंचायत समिती गणासाठी सुचेता सनी थिटे तर पाबळ गणासाठी वंदना प्रकाश पवार यांच्या उमेदवारीवर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब केला होता. दरम्यान प्रफुल्ल शिवले आणि सुचेता थिटे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी निश्चित केली होती. कार्यकर्त्यांची मते जाणून न घेता उमेदवारी जाहीर केल्याने केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराजीचा सूर व्यक्त करत होते. याच उद्रेकातू जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले विकास गायकवाड आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले दीपक खैरे यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत भाजपकडे उमेदवारीची मागणी केली.

दरम्यान जयश्री पलांडे, भगवान शेळके यांनी गायकवाड आणि खैरे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर पाहता काही उमेदवारी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करंदी येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर झालेल्या उमेदवारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत करंदीच्या इच्छुक उमेदवाराला संधी मिळावी यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे साकडे घातले आहे. तथापि करंदीच्या मागणीला जर दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर उमेदवारी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पाबळ गणात देखील अशाच प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून देखील उमेदवार निश्चित झाले असल्याचे संकेत जयश्री पलांडे यांनी दिले आहेत. भारतीय जनता पक्षाला कारकर्त्यांची मनधरणी करण्यात यश आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान जाहीर केलेल्या उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदलण्याची नामुष्की ओढवली तर भाजपचे पारडे आणखी जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे परस्पर उमेदवारी बदलली तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मोठी अडचण होणार एवढं मात्र नक्की.

error: Copying content is not allowed!!!