ताज्या घडामोडी प महाराष्ट्र महाराष्ट्र

पांडुरंगाच्या गाभाऱ्यात एक टन फुलांची आरास

पंढरपूर– कामिका एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे अधिक खुलून दिसत होता ही आरास बार्शी येथील विठ्ठल भक्त श्रीकांत शिवाजी गणगले यांनी केली आहे.

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कामिका एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभारा, सोळखांबी येथे फुलांनी सजवण्यात आला. यात झेंडू, मोगरा, कामिनी, ब्लू डी.जे, टॅटीस, शेवंती, गुलछडी, गुलाब आदी १५ फुलांचे प्रकार व पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली. १ टन फुले वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तीन महिन्यापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद..

पांडुरंगाच्या प्रमुख चार वाऱ्यापैकी आषाढी वारी मोठी असते. मात्र भाविक व वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रातिनिधिक स्वरूपाची वारी करण्यात आली. कोरोना दुसऱ्या लाटेमुळे 5 एप्रिल पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे भाविक नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.

error: Copying content is not allowed!!!