Uncategorized

सोनेसांगवीच्या विजयी उमेदवारांची रांजणगाव गणपती येथे जल्लोषासह विजयी मिरवणूक…!

रांजणगाव गणपती | शिरुर तालुक्यातील चार ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत बहुचर्चित ठरलेल्या मांडवगण फराटा आणि सोनेसांगवी ग्रामपंचायतचे थेट जनतेतील सरपंच पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गमवावे लागले आहे. मांडवगण फराटा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात तर सोनेसांगवीचे सरपंच पद बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खेचून आणले आहे.

सोनेसांगवी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या थेट सरपंच पदासाठी उमेदवार असलेल्या रेखा काळे यांचे पती मल्हारी काळे हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन दिवस गायब झाले होते. त्यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पोलिस प्रशासनाचे देखील या ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर बारीक लक्ष होते. निवडणूकीच्या दिवशी देखील मोठा पोलिस बंदोबस्त या गावात पाहायला मिळाला होता.

दरम्यान सोनेसांगवी ग्रामपंचायतवर वीस वर्षे सत्ताधारी असलेले दत्तात्रय कदम यांच्या पत्नी या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी उमेदवार होत्या. दत्तात्रय कदम हे शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या पॅनेलवर थेट माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मानसिंग पाचुंदकर यांचे फोटो लावून दत्तात्रय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. यामध्ये पाचुंदकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान भर प्रचार सभेत मल्हारी काळे यांनी आमच्या गावात लक्ष न घालण्याचे आवाहन मानसिंग पाचुंदकर यांना दिले होते. त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख बाप्पूसाहेब शिंदे सोनेसांगवीच्या विजयी उमेदवारांची रांजणगाव गणपती येथे मिरवणूक काढली. त्यामुळे सोनेसांगवीच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक ही चर्चेचा विषय ठरली आहे.

error: Copying content is not allowed!!!