मुंबई | रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र इन्व्हायरो पवार लि. या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे परीसरातील गावकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी प्रशासकीय पातळीवरील आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भातील ‘The बातमी’ ने एक चित्रफीत प्रदर्शित केली आहे. ती पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांची जमीन नापिक होत आहे. कंपनीच्या दूषित पाण्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडले आहेत, पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील गावांना देखील याचा हळूहळू धोका निर्माण होत आहे. निमगाव भोगी, अण्णापुर, कर्डीलवाडी, कारेगाव, शिरुर ग्रामीण, शिरुर शहर, सरदवाडी, तर्डोबाचीवाडी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात हे दूषित पाणी आढळून येत असल्याने. अनेकदा आंदोलने करण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी केला परंतु ते आंदोलन उधळून लावण्यात कंपनी यशस्वी झाली. परंतु यावेळी थेट शेखर पाचुंदकर यांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
याबाबत मुंबई येथे मंत्रालयात स्थानिक ग्रामस्थांनी उधोगमंत्री उदय सामंत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री सामंत यांनी आक्रमक होत. “तिथे कोणाची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, आपला कारखानदारीला विरोध नाही, आपण कारखानदारीसाठीच इथे बसलेलो आहे, मात्र कारखान्यांनी काहीही वाटेल ते करावं असं पण नाही ना. जोपर्यंत हे दूषित पाणी थांबत नाही तोपर्यंत कंपनीत चालणाऱ्या प्रक्रियेबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय करायचं ते ठरवतील”. तात्काळ याची दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रामभाऊ सासावडे, बाप्पूसाहेब शिंदे, तेजस फलके यांसह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Add Comment