शिरुर, पुणे | फसवणूकप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. अखेर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अखेर दीड वर्षांनंतर बांदल यांची तुरूंगातून सुटका होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर…!

Add Comment