शिरुर, पुणे | शैक्षणिक जीवनात अनेकांनी धेय्य बाळगलेली असतात पुढे जाऊन आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय परंतु ठरवलं एक आणि झालं एक असं देखील अनेकांचं होतं त्यापैकीच एक असलेल्या करंदी (ता. शिरुर) गावच्या सरपंच सोनाली किरण ढोकले.
नुकताच त्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्या वतीने भारतरत्न जे. आर. डी. टाटा ‘ग्रामभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावात शिक्षण घेऊन कुटूंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सोबतच राजकारणाबद्दल काहीही माहीत नसलेल्या सौ. सोनाली यांचा करंदीच्या किरण उर्फ बंटी ढोकले यांच्याशी विवाह झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवलं. गावच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पती किरण ढोकले यांच्या माध्यमातून सौ. सोनाली यांना गावातील राजकारण आणि समाजकारण जवळून अनुभवता आलं.
करंदीच्या सर्वात तरुण महिला सरपंच म्हणून सौ सोनाली ढोकले यांची ओळख आहे. कोरोना काळात तत्कालीन सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी स्वखर्चातून निधी उपलब्ध केला होता. सौ. सोनाली ढोकले यांच्या पाठपुराव्याने स्मशानभूमी, दशक्रिया घाट विकसित झाला. कोणत्याही निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर परस्पर विरोधी पक्षाचे किंवा गटाचे कार्यकर्ते सायंकाळी एकत्र चहापान करतात ही करंदी गावची विशेष ओळख आहे.
नुकताच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित व्यक्तींना भारतरत्न जे. आर. डी. टाटा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यापैकी ‘ग्रामभूषण’ हा पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सौ. सोनाली किरण ढोकले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागाचे संचालक सचिन ईटकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर करंदीचे उपसरपंच पांडुरंग ढोकले, गोरक्ष ढोकले, नितीन ढोकले, संदीप ढोकले, नितीन कदम, प्रवीण झेंडे, रविराज दरेकर, स्वप्नील दरेकर, योगेश ढोकले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
” राजकीय क्षेत्रातील कोणतही ज्ञान मला नव्हते, मला पोलिसमध्ये जायचं होतं परंतु सासरी आल्यानंतर सरपंच म्हणून गावची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा अत्यंत आनंद आहे, या पुरस्कारामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा मान मिळाला आहे. याचं सर्व श्रेय माझ्यासोबत गावचा विकास करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना जाते.” – सोनाली किरण ढोकले (सरपंच, करंदी)
Add Comment