रांजणगाव गणपती | आर एम धारिवाल आणि महागणपती फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून रांजणगाव मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ही स्पर्धा होणार असून १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत मुख्य उपस्थिती देखील असणार असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे मॅरेथॉन स्पर्धेचे सहावे आहे. आर एम धारिवाल आणि महागणपती फाऊंडेशन आयोजित रांजणगाव मॅरेथॉन २०२३ ( रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ ) रोजी राजमुद्रा चौक, रांजणगाव एमआयडीसी, रांजणगाव गणपती येथे होणार आहे.या कार्यक्रमाला या वर्षी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शोभा धारिवाल ( उपाध्यक्षा आर एम धारिवाल ) अभिनेता आकाश ठोसर, जान्हवी धारीवाल ( उपाध्यक्षा आर एम धारिवाल ) पूनित बालन ( अध्यक्ष, इंद्राणी बालन ग्रुप ) उपस्थित राहणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन महागणपती फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर करीत आहे. स्पर्धा सकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकावून सुरूवात होणार आहे.

Add Comment