Uncategorized

तुमच्या मतदार संघात कोणत्या दिवशी मतदान असेल वाचा सविस्तर..

देशात लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. यात प्रामुख्याने सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीची सुरुवात १९ एप्रिल रोजी होणार असून १ जून रोजी अंतिम टप्पा पार पडणार आहे. तसेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. देशातील सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभेची निवडणूक टप्पा आणि तारीख खालीलप्रमाणे :

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल मतदान

दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल मतदान

तिसऱ्या टप्प्यात७ मे मतदान

चौथ्या टप्प्यात १३ मे मतदान

पाचव्या टप्प्यात २० मे मतदान

सहाव्या टप्प्यात २५ मे मतदान

सातव्या टप्प्यात १ जून मतदान

मतमोजणी ४ जून

एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मतदारसंघ व मतदानाची प्रक्रिया कोणत्या दिवशी पार पडणार ते खालीलप्रमाणे:

पहिला टप्पा २१ एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा २६ एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा ७ मे सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा

चौथा टप्पा १३ मे नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा २० मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

अशा पद्धतीने निवणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उन्हाळ्यात तापमान लक्षात घेता उमेदवारांना प्रचारासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!