Uncategorized

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा ईडीची कारवाई…!


शिक्रापूरच्या घरी पत्नी, भाऊ ; पुण्यातील घरी स्वतः

शिक्रापूर – पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय पैलवान मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानावर दुसऱ्यांदा ईडीची कारवाई सुरू आहे. चार वर्षांत ईडीची ही दुसरी कारवाई बांदल यांच्यावर होत आहे.


पुण्यातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर ही धाड पडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत तर हडपसर येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल आणि सोबत पुतणे आहेत.


मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तर विधानसभा निवडणुकीबाबत ते चाचपणी करत होते. मंगलदास बांदल हे एका बँकेच्या प्रकारणामध्ये तुरुंगातून जामिनावर बाहेत आहेत.

error: Copying content is not allowed!!!