Uncategorized

छेडछाड, चोरी आणि खंडणी ! रांजणगाव येथील धक्कादायक प्रकार…!

रांजणगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रांजणगाव गणपती येथे खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन तब्बल २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १ सप्टें २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती-भांबार्डे रोडलगत असलेल्या बिल्डींगमध्ये फिर्यादी श्रीकांत तुकाराम शिंपले ( वय २५, मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड सध्या रा. रांजणगाव गणपती, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे ) यास आरोपी सुमित लक्ष्मण थोरात व प्रविण जगताप यांनी प्लंबिंगचे कामासाठी बोलावुन घेवुन काठीने मारहाण केली आणि त्या ठिकाणी एका मुलीस बोलावुन घेवुन तु हिची छेडछाड करुन तिचा मोबाईल व पैशाची चोरी केली असल्याचा तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला खोट्या गुन्हयात अडवितो अशी धमकी देवुन २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.त्यानंतर त्याच्याकडील मोबाईलमधील स्कॅनरवरती खंडणीची रक्कम फिर्यादीस पाठविण्यास सांगीतली. सदरची खंडणी स्वरुपात घेतलेली रक्कम त्याचे साथीदार आरोपी विशाल नवनाथ देसले व अभय रामटेके सर्व ( रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे ) यांचे मदतीने संगनमत करुन घेतली आहे.याप्रकरणी श्रीकांत शिंपले याच्या तक्रारीवरुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यात आरोपी सुमित लक्ष्मण थोरात, विशाल नवनाथ ढेसले या दोन आरोपींना अटक केली आहे.आरोपीकडुन खंडणीची रक्कम फिर्यादी कडुन घेतलेली २५ हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित आरोपी प्रविण जगताप आणि अभय रामटेके यांचा शोध घेवुन त्यांचा गुन्हयातील सहभागाबाबत खात्री करुन पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.

सदरची पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार सुभाष गारे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, चालक पोलिस हवालदार पांडुरंग साबळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.

Featured

error: Copying content is not allowed!!!