Uncategorized

ढोक सांगवी येथे आढळला अनोळखी मृतदेह !

ढोक सांगवी : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी येथे एका अनोळखी इसमचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोक सांगवी येथील गट नंबर ४०९ असलेल्या जागेमध्ये एक विहीर आहे. या विहिरीत दिनांक ०३/१०/२०२४ रोजी दुपारी ०१ च्या सुमारास विहिरीत एका अंदाजे ३५ ते ४० वयाचा पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची रघुनाथ रामचंद्र पाचंगे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत माहिती घेतली असता मयत इसमाची ओळख पटू शकलेली नाही. अंदाजे ३५ ते ४० वयाच्या अनोळखी इसमाचा काळा सावळा रंग, अंगावर काळे लाल रंगाचे हाफ बनियान असून निळे रंगाचे पँट, डोक्यास काळे केस, दाढी साधारण वाढलेली, मिशी काळी वळविलेली, ओठाखली आयडेंटी दाढी, कमरेला लाल रंगाचा करदोडा आहे. जर या इसमाची ओळख कुणालाही पटली तर रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार आर. बी. कर्डिले ( मो.९१७५७१८१९८ ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!