कारेगाव/शिक्रापूर : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पुणे नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैश्या व्यवसाय करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर येताना दिसत आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या कारेगाव येथील यश इन चौक, तसेच शिक्रापूर येथील चाकण चौक येथे वैश्या व्यवसाय करताना निदर्शनास येत आहे. काही महिला भर सायंकाळच्या सुमारास थांबून ग्राहकांच्या शोधात असतात. त्यानंतर त्या महिला जवळील असलेल्या यश इन चौकात व शिक्रापूर चाकण चौकातच लॉजिंगवर त्या ग्राहकांना घेऊन जाताना निदर्शनास येत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र यावर बंदी असताना देखील हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. वैश्या व्यवसाय करण्यास सरकारची बंदी असताना देखील भर चौकात या प्रकारचा सुळसुळाट सुरू असल्याने ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला आहे.
शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या हद्दीत असलेल्या शिरूर, रांजणगाव एमआयडीसी आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक हॉटेल्स लॉजिंगमध्ये ओळख पत्र सादर करणे बंधनकारक आहे. याच कारण असे आहे की, अनेक ठिकाणी जर एक किंवा त्याहून अधिक व्यक्ती निवास करण्यासाठी कोणत्याही हॉटेल्समध्ये जात असेल तर त्या व्यक्तींना ओळखपत्र देणे बंधनकारक असते आणि त्या ओळखपत्राची एक प्रत हॉटेल चालकांनी स्वतः जवळ ठेवणे आवश्यक असते. मात्र असे होताना कुठे दिसत नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिला वारंवार एकाच ठिकाणी जातात. परंतु त्याठिकाणी त्यांच्या ओळखपत्राची कुठे ही नोंद केली जात नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
शासन व न्यायालयाने हॉटेल लॉजींग चालकांना घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सामान्य माणसाला काही ठिकाणी उपोषणाला परवानगी दिली जात नाही आणि त्याच पोलीसकाकाच्या डोळ्यासमोर उघडपणे असे प्रकार सुरू आहेत. ‘कानुन के हाथ लंबे होतें हैं!’ या म्हणीचा योग्य वापर जर काकाने केला तर कायदा मोडायची हिंमत कोणाच्याही मनात येणार नाही.
कायदेशीर कारवाई करू : प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर
शिक्रापूर आणि कारेगाव येथे वैश्या व्यवसाय सुरू असेल तर त्यावर आम्ही नक्की कारवाई करू. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या समोर कारवाई करण्यात आली आहे. जर यात कुणी पोलीस कर्मचारी व्यावसायिकांशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
Add Comment