Uncategorized

कारेगावच्या सरपंचपदी वृषाली गवारे यांची बिनविरोध निवड !

कारेगाव : पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या वृषाली प्रशांत गवारे यांची बिनविरोध सरपंचपदी यांची निवड झाली आहे. पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत गवारे यांची निवड करण्यात आली आहे.

कारेगावच्या रिक्त झालेल्या सरपंच पदावर निर्मला नवले यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच असलेल्या तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र अगदी दोन दिवस पदभार स्वीकारल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक लावण्याची ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांनी तयारी केली. त्याच अनुषंगाने आज ( दि. १८.१०.२०२४ ) रोजी वृषाली प्रशांत गवारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव पुंडलीक साळवे यांनी केली आहे. वृषाली गवारे यांना मिळालेल्या पदामुळे ग्रामस्थांकडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

यावेळी ग्रामविकास अधिकारी किसन बिबे, गावकामगार तलाठी रवींद्र जाधव, उपसरपंच नवले तुषार प्रकाश, निर्मला शुभम नवले, नवले संदीप विश्वास, कोहोकडे अजित प्रल्हाद, नवले सोनाली विकास, तळेकर शहाजी पोपट, फलके तेजस गणपत, शेलार नागेश सर्जेराव, कोहोकडे जयश्री रामदास, जगताप हौसाबाई लाला ( सर्व ग्रामपंचायत सदस्य ) १३ पैकी ११ सदस्य उपस्थित होते.

Featured

error: Copying content is not allowed!!!