शिरूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.यात महायुतीतील एकूण २६ घटक पक्षांतील नेत्यांना देखील स्टार प्रचारांकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. यात पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादीत नाव आले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस व इतर घटक पक्षांचे जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत प्रचारासाठी महायुतीतील एकूण २६ जणांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा असे एकूण २६ जणांची यादी जाहीर करण्यात आली असून यात शिरूर तालुक्यातील दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. जनता ( सेक्युलर ) दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथा शेवाळे आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे या दोन नेत्यांची निवड झाल्याने शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. प्रथमच शिरूर तालुक्याला स्टार प्रचारक यादीत नाव आल्याने आता या दोन नेत्यांवर राज्यातील विविध भागात प्रचाराच्या माध्यमातून मोठी जबाबदारी असणार आहे.
महायुती घटक पक्ष स्टार प्रचाराकांची यादी पुढीलप्रमाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना ( शिंदे गट ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (अजित पवार ) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, आर.पी.आय. गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, बहुजन रिपब्लिकन एकता मंच सुलेखा कुंभारे, रयत क्रांती संघटना सदाभाऊ खोत, भाजप प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना दादाजी भुसे, राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, जनता ( सेक्युलर ) दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथा शेवाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा, भीमसेना अनिल कांबळे, लहुजी शक्ती सेनाचे अध्यक्ष विष्णु कसबे, अखिल मराठा महासंघचे अध्यक्ष सयाजी दहातोंडे, दलीत पँथरचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तानसेन ननावरे, राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे अध्यक्ष श्रीहरी बागल, भीमशक्तीचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनाचे अध्यक्ष रधाजी शेळके
Add Comment