शिरुर : आंबेगाव-शिरुर मतदार संघातील ४२ गावात जागोजागी देवदत्त निकम यांचं जंगी स्वागत होत आहे. निकम यांचा प्रचार दौरा सुरू असताना हिवरे गावात एका जेष्ठ व्यक्तीने ‘साहेब हे पाचशे रुपये घ्या आणि तुम्ही आत्ताच गुलाल घ्या’ असे उदगार काढल्याने सभेत टाळयांचा कडकडाट झाला. लोकवर्गणीची रीघ सध्या निकम यांच्याकडे लागल्याने आंबेगाव-शिरुर मतदारसंघात यंदा सर्वसामान्य लोक ‘भाकरी’ नक्की फिरवणार असे वातावरण सध्यातरी दिसत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ चर्चेत आहेत.
आंबेगाव-शिरुर मध्ये गेली ३५ वर्षे आमदार आणि २८ वर्षे विविध खात्याचे मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध राष्ट्रवादी ( शरद पवार ) काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. शिरुर तालुक्यातील विविध गावात प्रचार दौरा सुरु असताना गावातल्या पारावर कोपरा सभा सुरु असताना गावातील जेष्ठ व्यक्ती लोकवर्गणी देताना पाहायला मिळत आहे.
आंबेगाव-शिरुर मतदार संघात दिलीप वळसे पाटील हे आर्थिक दृष्टया सधन उमेदवार आहेत. त्या तुलनेत देवदत्त निकम हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवार असल्यामुळे आंबेगाव-शिरुर मतदार संघातील ४२ गावातील सर्वसामान्य मतदार निकम यांना मदत म्हणुन प्रचार दौऱ्यात विविध गावांमधून लोकवर्गणी देत आहे. अनेक वर्षे वळसे पाटील यांच्यासोबत असलेले देवदत्त निकम आता वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु वळसे पाटलांनी शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे गावोगावी नाराज झालेले ग्रामस्थ निकम यांच्यासाठी सहानुभूती देत असल्याने ही निवडणुक मोठी चुरशीची होणार आहे.
Add Comment