शिरूर : रांजणगाव येथे पोलिसांनी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. अखेर ‘The बातमी’च्या लढ्याला यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत किरण अनिल लोखंडे ( वय ३० ) आणि फिरोज रजा तांबोळी ( वय. ३२, रा. रांजणगाव ) हे दोघेही जण वेगवेगळ्या ठिकाणी ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार खेळवीत असताना पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांच्याकडून जुगार खेळवण्यात येणाऱ्या वस्तू व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी अनेक दिवसांपासून शाळेजवळ सुरू असलेल्या अवैध मटका जुगार व्यवसायाबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या ठिकाणी लहान मुलांवर चुकीचा प्रभाव पडत असल्याची पालकांची चिंता वाढली होती. ‘The बातमी’ च्या माध्यमांमधून सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक परिसरातील जुगार व्यवसायाला धक्का बसला आहे.
Add Comment