मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.एकूण ३२ जिल्हा परिषद आणि ३३४ पंचायत समित्यांमधील जागांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याची ही महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
आरक्षण सोडतीनंतर जिल्हाधिकारी प्राथमिक आरक्षण जाहीर करतील. त्यावर हरकती व सूचना घेण्यात येतील. त्यानंतर विभागीय आयुक्त अंतिम अहवाल शासनाकडे सादर करतील. ३ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणाचा तिढा सुटणार आहे.—
Add Comment