दौंड

अल्काईल कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी

कुरकुंभ : येथील औद्योगिकनगरी (ता.दौंड) मधील अल्काईल अमाईन्स केमिकल या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) च्या माध्यमातून श्री फिरंगाईमाता माध्यमिक विद्यालयास तीन आर.सी.सी वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत.विद्यालयात मंगळवार (दि.१८) रोजी या वर्ग खोल्यांचा शाळार्पण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

श्री फिरंगाईमाता माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात एल.के.जी पासून बारावी पर्यंत परिसरातील जवळपास १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.वाढत जाणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेता अल्काईल कंपनीने विद्यालयास तीन वर्ग खोल्या बांधून दिल्याने विद्यार्थ्यांची बसण्याची मोठी सोय झाली आहे. कंपनीने या अगोदर देखील विद्यालयास सौर उर्जा प्लँट,वॉटर प्लँट तसेच दहा वर्षापूर्वी १० संगणक संच दिले आहेत.त्यासोबत अल्काईल कंपनी कुरकुंभ येथे दरवर्षी दौंड तालुका स्तरीय श्री फिरंगाई क्रीडा महोत्सव विद्यालयात भरवित असते. अशी माहीती विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी दिली.कुरकुंभचे सरपंच आयुब शेख आणि उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य केशवराव आनंदराव शितोळे यांच्या हस्ते वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी उपसरपंच विनोद शितोळे,संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल शितोळे,संचालक अशोकराव शितोळे,अल्काईल अमाईन्सचे मॅनेजर संजय कुलकर्णी, युनिट हेड राजेश कावळे, पर्यवेक्षक सिकंदर शेख तसेच विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!